रत्नागिरी अप्पर जिल्हाधिकारीपदी भाऊ गलांडे यांची नियुक्ती

रत्नागिरी : रत्नागिरीचे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून पुणे येथील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळावरील सदस्य भाऊ बाळू गलांडे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी शुक्रवारी पदभार घेतला.

अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांची बदली झाल्याने ही जागा रिक्त होती. भाऊ गलांडे यांनी २००७ मध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात २००८ ते २०१० कामकाज पाहिले. त्यानंतर सांगली जिल्ह्यात भूसंपादन अधिकारी, करवीर येथील उपविभागीय अधिकारी, सांगलीत जिल्हा पुरवठा अधिकारी, पुणे उपविभागीय अधिकारी, कोल्हापूर येथील निवासी उपजिल्हाधिकारी, पुणे येथे भूसंपादन अधिकारी, त्यानंतर पुणे येथे महाराष्ट्र राज्य रस्तेविकास महामंडळ येथे ते कार्यरत होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 26-04-2025