खेड : काश्मीरमध्ये पर्यटकांवरील झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आणि मृत पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी २३ रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे खेडवासीय एकत्र आले होते.
यावेळी मृतांना श्रद्धांजली वाहून एक भारतीय म्हणून दहशवादी कृत्याचा उपस्थितांनी निषेध व्यक्त केला. नागरिकांनी पुष्प अर्पण करून व मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली वाहली.
यावेळी वैभव खेडेकर, संजय मोदी, संजय बुटाला, अॅड. अमेय मालशे, अनिकेत कानडे, नीलेश बामणेनंद साळवी, ऋषिकेश कानडे, डॉक्टर उपेंद्र तलाठी, राजू बुटाला नरेश इदाते, आप्पा मेहता, मन्सूर मुकादम, रहीम सही बोले, सरफराज पांगरकर, जावेद कौचारी, नईम चौगुले, शेखर पाटणे, रोहन विचारे, अमर दळवी, ब्रह्म कुमारी गीता बहेन, स्वप्निल सैतवडेकर, मिलिंद नांदगावकर, प्रशांत सावंत, अनुज जोशी, पद्माकर बेंडखळे, प्रकाश तटकरी, डॉ. विक्रांत पाटील, परेश चिखले, भूषण चिखले, ओमकार गोंदकर, मिलिंद तलाठी, सचिन चव्हाण, माधवी बुटाला, सीमा वडकर, वैद्य, अनिल सदरे, रोहन राठोड, प्रशांत बारटक्के, डॉ. मरकड, डॉ. शाम गिल्डा, संतोष शिंदे, दीपक नलावडे, शरद शिर्के, राहुल पाटणे, डॉक्टर वेद तलाठी, शशांक सिनकर, दीपक जैन, स्वरूप दळी तसेच खेड शहरवासीय उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:27 AM 26/Apr/2025














