दापोली : सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन; प्रौढावर गुन्हा

दाभोळ : दाभोळ पोलिसांनी २४ एप्रिल २०२५ रोजी केलेल्या कारवाईत एका व्यक्तीला उघड्यावर दारू पिताना ताब्यात घेतले आहे. आरोपी विनोद वसंत गोसावी (वय ३६, सध्या रा. भारतीय शिपीवाई, दाभोळ, ता. दापोली, मूळ रा. लालनगर तेवार्द, जि. कोल्हापूर) याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ५.४० वाजण्याच्या सुमारास दाभोळ ते भाटी जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला भारतीय शिपयार्ड कंपनीजवळ उघड्या जागेत आरोपी विनोद गोसावी हा जी.एम. (संत्रा) देशी दारूची बाटली घेऊन दारू पित बसलेला आढळला. दाभोळ सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल देवानंद शालिराम बोरकर यांनी ही कारवाई केली.

याप्रकरणी दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ०९/२०२५, महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत कोणतीही दारूची बाटली जप्त करण्यात आलेली नाही. पुढील तपास दाभोळ सागरी पोलीस करत आहेत. या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात सायंकाळी ६.३८ वाजता झाली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:59 PM 26/Apr/2025