राजापूर : तालुक्यातील परटवली, कुंभारवाडी येथे एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुनिता नारायण पेंडखळकर असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना २४ एप्रिल रोजी सकाळी १०.४५ वाजेच्या पूर्वी त्यांच्या राहत्या घराच्या पाठीमागील पडवीत घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनिता पेंडखळकर यांनी अज्ञात कारणावरून त्यांच्या राहत्या घराच्या पाठीमागील पडवीमध्ये वाशाला दोरीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला. या घटनेची नोंद राजापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:34 PM 26/Apr/2025














