चिपळूण : कृषी विभागाच्या शासन निर्णयानुसार यापुढे कृषीविषयक शासकीय योजनांचा व अनुदानाचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. यामध्ये पीएम किसान योजनेचा समावेश आहे. अॅग्रीस्टॅक योजनेच्या अनुषंगाने शेतकरी नोंदणी प्रक्रिया नागरी सुविधा केंद्रावर किंवा त्याचबरोबर शेतकरी स्वतः नोंदणी करू शकतील यासाठी Farmer Login पर्याय देण्यात आला आहे.
मुंबई, पुणे या ठिकाणी कामानिमित्त गेलेले खातेदार योना कोणत्याही/त्या-त्या ठिकाणी केंद्रावर पर्याय वापरून नोंदणी करता येणार आहे. पीएम किसान योजनेच्या ज्या लाभार्थ्यांनी नोंदणी केलेली नाही अशा लाभार्थ्यांचा लाभ बंद होण्याची शक्यता आहे. तरी सर्व खातेदारांनी तातडीने नोंदणी करावी, असे असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 AM 28/Apr/2025













