चिपळूण : भगवान श्री परशुराम जन्मोत्सव सोहळा आजपासून

चिपळूण : भगवान श्री परशुराम यांचा जन्मोत्सव सोहोळा वैशाख शु. प्रतिपदा सोमवार दि. २८ एप्रिल ते वैशाख शुद्ध तृतीया गुरुवार दि. १ मे या कालावधीत होणार आहे. मंगळवार दि. २९ एप्रिल रोजी सायंकाळी ७:१५ वाजता भगवान श्री परशुराम यांचा प्रत्यक्ष जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे.

या उत्सव सोहळ्यानिमित्त परशुराम मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ह.भ.प श्री प्रणवबुवा गोखले यांचे ४ दिवस सुश्राव्य कीर्तन, कोकण गंधर्व राजाभाऊ शेंबेकर चिपळूण, गौरी जोशी (परशुराम) व श्रुती सापते (चिपळूण) यांची संगीत सभा तर ह.भ.प अंजली बर्वे (रत्नागिरी) यांचे भृगुकुळ या विषयावर प्रवचन, ह.भ.प मंदार ओक (चिपळूण) यांचे गुरू ब्रझेंद्रस्वामी या विषयावर प्रवचन होणार आहे. तसेच जन्मोत्सवाचे दिवशी म्हणजेच दि. २९ एप्रिल रोजी कात्यायनी महिला मंडळ चिपळूण यांच्यावतीने सामूहिक श्रीविष्णू सहस्त्रनाम पठण होणार आहे. याचबरोबर श्रीविष्णु याग, श्रींची महापूजा, छबीना इत्यादी धार्मिक कार्यक्रम देखील होणार आहेत. उत्सवानिमित्त परशुराम नाट्य समाज यांच्या वतीने दि. १ मे रोजी नाटक सादर केले जाणार आहे.

भाविकांनी भगवान श्री परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त श्री क्षेत्र परशुराम (ता. चिपळूण) येथील कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन विश्वस्त समिती, संस्थान श्री भार्गवराम परशुराम यांच्यावतीने करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 AM 28/Apr/2025