चिपळूण शहरातील अनधिकृत भंगार गोदामांवर कारवाईसाठी १ मे रोजी लाक्षणिक उपोषण

चिपळूण : शहरातील अनधिकृत भंगार गोदामांवर प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास दि. १ मे २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात लाक्षणिक उपोषण छेडण्याचा इशारा शिवसेना शिंदे गटाचे चिपळूण उपशहरप्रमुख सचिन शेट्ये यांनी दिला आहे. या बाबत त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.

या निवेदनानुसार, चिपळूण शहरातील विविध प्रमुख नागरी वस्ती असलेल्या भागात अनेक भंगार गोदाम कायमस्वरूपी उभारल्याचे दिसून येत आहे. शहरातील मुख्य ठिकाणी या भंगार व्यावसायिकांनी राजरोसपणे व्यवसाय सुरू ठेवला आहे. मात्र, याच भंगार गोदामातील ज्वलनशिल घटकांमुळे आग लागण्याचे प्रकार काही दिवसांपूर्वी घडले आहेत. त्यामुळे नागरी वस्तीपासून लांब शहराच्या बाहेर अशा गोदामांना परवानगी देणे गरजेचे आहे, असे शिवसेनेच्या शिंदे गटाचे उपशहरप्रमुख सचिन शेट्ये यांनी म्हटले.

दरम्यान, अनधिकृत भंगार गोदामांवर कारवाई न झाल्यास महाराष्ट्रदिनी उपोषण छेडण्याचा इशारा सचिन शेट्ये यांच्याकडून देण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 AM 28/Apr/2025