मंडणगड : इंधना अभावी ग्रामीण रुग्णालयाची सेवा ठप्प

मंडणगड : इंधनाअभावी ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहीका सेवा वळोवेळी ठप्प होत असल्याने या संदर्भात नगरसेवक आदेश मर्चडे यांनी रुग्णालय व्यवस्थापनास चांगलेब धारेवर धरले. दरम्यान ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. बालाजी सगरे यांच्याशी जागरुक नागरीकांनी रुग्णालयातील विविध समस्या संदर्भात दीर्घकाल चर्चा केली व नागरीकांच्या समस्या मांडल्या.

यावेळी रिपाई आठवले गटाचे जिल्हा सरचिटणीस आदेश मर्चडे, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य विनोद जाधव, डॉ. प्रभाकर भावठाणकर, विजय खैरे आदी नागरिक उपस्थित होते.

१०८ या अत्यावश्यक रुग्णवाहीकेच्या सेवेसंदर्भात यावेळी प्रामुख्याने प्रश्न उपस्थित करण्यात आले. या सेवेसाठी शासन पुरेसा निधी उपलब्ध करुन देत असतानाही अंत्यव्यस्थ स्थितीतील महिला, जखमी आपद्ग्रस्त व रुग्णांना रुग्णालयात येण्यासाठी गाडी अभावी ४ तास प्रतीक्षा का करावी लागते असा संतप्त सवाल नागरीकांनी यावेळी उपस्थित केला.

नकुतेच इंधन नसल्याने एका रुग्णास जखीम असतानाही गाडीसाठी चार तासांची प्रतीक्षा करावी लागलेला असल्याचा गंभीर प्रकार यावेळी चर्चीला गेला. या रुग्णवाहीकेवर कार्यरत डॉक्टर व चालकाशी ही प्रत्यक्ष चर्चा करण्यात आली. यावेळी रुग्णालयातील विविध समस्यांसदर्भात चर्चा करण्यात आली व यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्याचे आश्वासन देण्यात आले.

रुग्णलायाची रुग्णवाहीका व जनरेटरसाठी वेळेवर उपलब्ध होत नसलेलल्या डिझेलची व्यवस्था करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा करण्याचे ठरले. रुग्णालयात महिलांसाठी सुरु करण्यात आलेल्या सोनोग्राफी सेंटरसाठी टेक्नीशियन नियुक्त करण्यात यावा यासाठी प्रयत्न करण्याचे ठरले. रुग्णालयात कायम स्वरुपी एम.बी.बी.एस. डॉक्टर नियूक्त करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. याशिवाय तालुक्यात चार तज्ज्ञ अनुभवी वैद्यकीय अधिकारी हवेत, १०८ रुग्णवाहिकेची देव्हारे आरोग्य केंद्रांत सुविधा उपलब्ध करावी, १०८ रुग्णवाहिकेवर एकच वैद्यकीय अधिकारी असल्याने अजून एका वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणीही या निमित्ताने करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:46 PM 28/Apr/2025