खेड : ज्ञानदीप स्कूल मोरवंडे-बोरज येथे ‘पोषण पखवाडा’ अभियान

खेड : तालुक्यातील मोरवंडे बोरज येथे ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल येथे १२ ते २६ एप्रिल या दिवसांमध्ये केंद्र सरकारच्या ‘पोषण अभियान’ अंतर्गत ‘पोषण पखवाडा’ हा उपक्रम राबवण्यात आला.

‘पोषण पखवाडा’ म्हणजेच पोषण आणि आरोग्याच्या महत्त्वाच्या जनजागृतीसाठी एक पंधरा दिवसांचा उपक्रम. या उपक्रमा अंतर्गत प्रशालेमध्ये विविध उपक्रम राब वण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी अनेक मार्गदर्शनपर शिबिर घेण्यात आले.

पौष्टिक आहाराचे महत्व, कुपोषणाचे दुष्परिणाम, भारतीय पदार्थाचे पौष्टिक मूल्य, अन्न तयार करताना आणि वापरताना स्वच्छता आणि स्वच्छते बद्दल जागृतिकरण याविषयी विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. तसेच मुलांना घरचे पौष्टिक अन्न देण्याचे महत्व व मुलांमध्ये निरोगी खाण्याच्या सवयी जोपासणे यावर पालकांसाठी ही मार्गदर्शनपर शिबिर घेण्यात आले.

मार्गदर्शन शिबिरा बरोबरच ‘संतुलित आहाराचे महत्व’ या विषयावर विद्यार्थ्यांसाठी ‘पोस्टर मेकिंग’ व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशालेचे प्राचार्य भरत मोरे, प्राथमिक विभाग प्रमुख शर्वरी शिर्के, हेल्थ केअर टेकर शितल भोसले, प्रशालेतील शिक्षक पूनम आंब्रे, श्रद्धा निकम, नितीन जासूद, अविनाश चौगुले तसेच इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:12 AM 29/Apr/2025