रत्नागिरी : नगर भूमापन कार्यालयाकडून गावखडी येथे उद्या जिवंत मिळकत पत्रिका उपक्रम

रत्नागिरी : राज्य शासनाच्या १०० दिवस कृती आराखड्याअंतर्गत नावीन्यपूर्ण उपक्रमातून नगर भूमापन कार्यालयामार्फत गावखडी येथे बुधवारी (३० एप्रिल) जिवंत मिळकत पत्रिका उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी मिळकत पत्रिकेवरील मयत धारकांच्या वारस नोंदीबाबतची संपूर्ण प्रक्रिया पार पडणार असून मिळकत पत्रिकेवरील धारकांची नावे अद्ययावत केली जाणार आहेत. नागरिकांना कार्यालयात न येता घरपोच सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सर्व नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगर भूमापन कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:06 29-04-2025