रत्नागिरी : शहरातील जयस्तंभ येथील नगर वाचनालयासमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञाताने लांबवली. ही घटना सोमवार २८ एप्रिल रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वा. कालावधीत घडली आहे. याबाबत मयूर आनंद विलणकर (वय २८) याने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
त्यानुसार, सोमवारी सकाळी १० वा. सुमारास त्याने आपली यामाहा कंपनीची दुचाकी जयस्तंभ येथील नगरपरिषदेच्या वाचनालयासमोर पार्क केली होती. सायंकाळी ५ वा. सुमारास तो आपण दुचाकी पार्क केलेल्या ठिकाणी गेला असता त्याला दुचाकी दिसून आली नाही. त्याने आजुबाजुला दुचाकीचा शोध घेतला परंतू, दुचाकी कोठेही दिसून आली नाही.
आपली दुचाकी चोरीला गेल्याचे लक्षात येताच त्याने शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:12 AM 01/May/2025














