चिपळूण : वालोटी येथून एमएसईबीची ९० हजारांची विद्युत वाहक तार चोरीस

चिपळूण : तालुक्यातील वालोटी गोटलवाडी येथे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची ९० हजार रुपये किंमतीची ३३ के. व्ही. विद्युत वाहक तार अज्ञाताने चोरली आहे. या प्रकरणी शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना दि. ७ ते २४ एप्रिल या कालावधीत घडली. याबाबत सुजित चंद्रकांत शिंदे (रा. चिपळूण) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ कंपनीची ३३ के. व्ही. विद्युत वाहक तार अज्ञाताने कटरने कट करून चोरून नेली. यामध्ये ८० स्क्वे. एमएम अॅल्युमिनिअमची तार व आतील बाजूने स्टीलची तार चोरून नेली. अधिक तपास शिरगाव पोलिस करीत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:55 AM 09/May/2025