खेड बसस्थानक परिसरात महिलेची पर्स चोरट्यांनी लांबवली

खेड : येथील बसस्थानकातून सुटणाऱ्या खेड-चिपळूण बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा उठवत एका महिलेची ४ हजार रुपये व इतर किरकोळ सोने असलेली पर्स चोरट्याने लंपास केली. ही घटना सोमवारी दि.५ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. येथील पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्या शितप (रा. सुसेरी क्र. २. खेड) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्या चिपळूण येथे जाण्यासाठी येथील बसस्थानकात आल्या होत्या. फलाटावर लागलेल्या खेड-चिपळूण बसमध्ये चढत असताना चोरट्याने पर्सवर डल्ला मारत पोबारा केला. पर्स चोरीला गेल्याचे लक्षात येताच महिलेने पोलिस स्थानक गाठत तक्रार दिली. सुट्टीचा हंगाम सुरू झाल्याने त्या-त्या मार्गावर धावणाऱ्या बसफेऱ्या गर्दीन धावत आहेत. याचाच फायदा उठवत महिलांच्या पर्स लांबवण्याचे सत्र सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:08 AM 09/May/2025