मोबाईलच्या युगात मनाचे श्लोक पठण करा : योगेशबुवा रामदासी

रत्नागिरी : आजच्या जीवनात मोबाईल, कॉम्प्युटरच्या युगातही स्वामी समर्थ रामदास यांनी लिहिलेले मनाचे श्लोक खूपच उपयुक्त आहेत. या श्लोकांचे सामर्थ्य आजही अनेकजण अनुभवत असून सर्वांनी मनाचे श्लोक पाठ करून नित्यनेमाने पारायण करा, असे श्री समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह प्रतिपादन योगेशबुवा रामदासी यांनी केले.

पुण्याच्या समर्थ भारत अभियान व सज्जनगडच्या श्री समर्थ सेवा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने मनाचे श्लोक पठण स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात ते बोलत होते. शिर्के प्रशालेच्या रंजन मंदिरात कार्यक्रम झाला. स्पर्धेत २८ शाळांतील विद्यार्थी सहभागी झाले. यातून आंतरशालेय स्पर्धेसाठी ३५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. सत्कार सोहळ्याला र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, डॉ. नीलेश शिंदे समर्थ भारत अभियानाचे अध्यक्ष डॉ. राजीव नगरकर, लायन्स क्लबचे अध्यक्ष गणेश धुरी उपस्थित होते. समर्थ भारत अभियानच्या शाखा समन्वयक डॉ. निशिगंधा पोंक्षे यांनी प्रास्ताविक केले. स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना चषक, पदक व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेअंती ७० विद्यार्थ्यांची निवड फेब्रुवारीमध्ये पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी करण्यात आली.

विजेत्यांची नावे अशी
पहिली व दुसरी- प्रथम-सुनिधी करकरे, चैत्राली साळवी, अनुष्का नानिवडेकर, द्वितीय अस्मी अभ्यंकर, अनन्या रानडे, निषाद मेहंदळे; तृतीय आराध्य ढोल्ये, रवी वारंग, अर्जुन पंडित; उत्तेजनार्थ श्रवण लाड, दुर्वा बंडबे, अन्वीत शितुत, श्रीजा लिंगायत, देवयोगी सुर्वे, कौशिकी नवाथे, त्रिशा लिंगायत; तिसरी व चौथी- प्रथम वर्धन बेहेरे व शौनक गोखले, द्वितीय रूही गांधी व शाल्वी निमकर, तृतीय दुर्वा आगाशे व भुवनेशः उत्तेजनार्थ – रितीशा माईनकर, मुक्ता पळसुलेदेसाई, शुभ्रा कापडी, ज्ञानेश काळे, रिया काजरेकर, रूद्र जोशी, पलक काजरेकर पाचवी व सहावी वल्लरी मुकादम, वेदश्री भागवत, आर्वी कुलकर्णी, ऋतिका पांचाळ, सातवी व आठवी- मुक्ता बापट, आदिती कातकर, सोनाक्षी सरदेसाई, आर्य दांडेकर, ओम पिलणकर; नववी व दहावी- पूर्वा जोशी, पूर्वी चौघुले, मुक्ता जोशी, प्रेरणा भोजने, श्वेता कातकर, दिव्या जड्यार. खुला गट- स्मिता पाटील, वेदांगी वक्रदेव, प्रवीण जोशी, संतोष चव्हाण.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:37 PM 10/Oct/2024