दापोली : करजगाव येथे विहिरीत पडून वृद्धाचा मृत्यू

जालगाव : दापोली तालुक्यातील करजगाव बुरूमवाडी येथे सहदेव बाबाजी चांदवडे (७१) यांचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी १० मे रोजी दुपारी ३ च्या सुमारास घडल. दापोली पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सहदेव बाबाजी चांदवडे (रा. मोरेगाव नालासोपारा मूळ रा. बुरूमवाडी, करजगाव) यांचा मुलगा संदेश चांदवडे हा वाडीच्या पूजेचे साहित्य तामसतीर्थ समुद्रकिनाऱ्यावर विसर्जन करण्यासाठी गेले होते. घरी परल्यावर त्याने वडिलांना घरात शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते कुठेही दिसले नाहीत. नंतर त्यांची काठी घरासमोरील एका विहिरीच्या बाजूला दिसून आली. त्याने विहिरीत पाहिले असता सहदेव विहिरीत पडलेले आढळून आले.

संदेशने तत्काळ ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना बाहेर काढून दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सहाय्यक पोलिस फौजदार गुजर पुढील तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:58 PM 12/May/2025