साखरपा बसस्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे

साखरपा : रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील साखरपा हे व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे बसस्थानक असल्यामुळे तिथे कायम प्रवासी असतात. सुरक्षिततेच्या दृष्टीने या बसस्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असल्याचे एसटी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील साखरपा बसस्थानकाची रायगड विभागाचे विभागीय वाहतूक अधीक्षक मनीषा पाटील यांनी पाहणी केली. साखरपा बसस्थानक परिसरात लावण्यात आलेल्या बॅनरमुळे बसस्थानकातून बाहेर पडणाऱ्या बसेसना येणारी वाहने दिसत नाहीत, ही बाब विभागीय अधीक्षकांच्या निदर्शनास आणून देण्यात आली.

त्यानंतर बसस्थानकाच्या आवारात लावण्यात येत असलेल्या खासगी वाहनांबाबत लवकर निर्णय घेण्यात येणार असून, त्यासाठी बसस्थानक आवारात पे अँड पार्किंगची व्यवस्था केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

साखरपा बसस्थानक हे व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे असल्यामुळे कायमच प्रवाशांची रेलचेल असते. त्यामुळे बसस्थानकाचे काम पूर्ण झाल्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या वेळी विभागीय वाहतूक अधीक्षक मनीषा पाटील, सुहास कांबळे, विभागीय आणि अन्य अधिकारी हजर होते. त्यांच्यासोबत राऊळ मलुष्टे वर्कशॉप अधीक्षक (कार्यशाळा) गणेश वायदंडे, वाहतूक नियंत्रक सलीम साठविलकर, वाहतूक नियंत्रक देवरूख सचिन शेजवळ, वाहतूक नियंत्रक विलास शेळके आणि प्रवासीमित्र उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:03 PM 15/May/2025