साखरपा : गेले चार दिवस पडलेल्या अवकाळी पावसामुळे मे फ्लॉवरना बहर आला आहे. जागोजागी या फुलांचे गुच्छ फुललेले दिसत आहेत. मे फ्लॉवर या फुलांना फुटबॉल लिली असेही म्हणतात. चेंडूसारख्या गोल आकारामुळे त्या झाडांना हे नाव पडले आहे.
मे फ्लॉवर झाडाची उंची साधारण एक ते दीड फूट असून, हे कंद एरवी जमिनीत निद्रिस्त असतात. पावसाच्या पाण्याबरोबर हे कंद वाढण्यास प्रारंभ होतो आणि पाने उगवण्यास सुरुवात होते. पाठोपाठ फुलेही येतात. या झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे एका कंदापासून वर्षभरात एकदाच आणि एकच फूल येते.
तीन ते चार दिवस हे फूल राहून मग ते कोमेजून जाते. या फुलांचे नाव मे फ्लॉवर असले तरीही फुले साधारणतः पावसाळ्यात फुलत असल्यामुळे कोकणात ही फुले बहुतांश वेळेला जून महिन्यातच फुललेली दिसतात; पण यंदा मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातच मोठा अवकाळी पाऊस पडल्यामुळे ही फुले नावाप्रमाणे मे महिन्यातच फुलली आहेत. लाल, गुलाबी रंगाची ही फुले सध्या अनेकांच्या बागेत उमललेली दिसत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 AM 16/May/2025













