चिपळूण : तालुक्यात काल वळवाचा पाऊस कोसळला. पोफळी परिसराला मुसळधार पावसाने झोडपले. त्यामुळे साऱ्यांचीच दाणादाण उडाली. काही काळ वीजपुरवठाही खंडित झाल्याने या भागातील ग्रामस्थांसह व्यापाऱ्यांनाही फटका बसला. सायंकाळी उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरू झाला नव्हता.
पावसामुळे आंबा बागायतदारांच्या उरात धडकी भरली आहे. बहादूरशेख नाक्यावर वाहनांची नेहमीप्रमाणे गर्दी होती. वाहतूक पोलिसांना छत्री घेऊन वाहतूक सुरळीत करावी लागली. पावसामुळे सायंकाळी बाजारपेठेत शुकशुकाट होता. अनेकजण खरेदीला बाहेर पडलेच नाही.
बस स्थानकावर एसटीची वाट पाहत थांबलेले प्रवासी आडोसा बघून थांबत होते. तिवरे, खडपोली, अलोरे, पिंपळी, कुंभार्ली परिसरात मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर शहरात झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे साऱ्यांचीच त्रेधातिरपीट उडाली. चिपळूण शहरात दुपारी तीन वाजता पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. वाराही सुटला होता. त्यामुळे बाजारपेठेतही सन्नाटा पसरला होता.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:00 AM 19/May/2025













