रत्नागिरी : जिल्ह्यातील केंद्रप्रमुखांची रिक्त पदे पदोन्नतीने भरण्याची मागणी

चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यात रिक्त असलेले केंद्रप्रमुखपद तातडीने भरण्याची मागणी केंद्रप्रमुख संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाबाजी शिर्के यांनी जिल्हा परिषदेला निवेदनाद्वारे केली आहे. जिल्ह्यात एकूण २५१ केंद्र मंजूर आहेत. यातील ७५ केंद्रप्रमुख कार्यरत आहेत; मात्र १७६ केंद्रप्रमुख पदे रिक्त आहेत. तालुकानिहाय रिक्त पदांची संख्या पाहता केंद्रप्रमुख यांच्या रिक्त जागा तत्काळ भरण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यात केंद्रप्रमुखांची रिक्त पदे मोठ्या प्रमाणात असून, शैक्षणिक कार्य प्रभावित होत आहे.

अनेक केंद्रप्रमुखांकडे केंद्रांचा अतिरिक्त कार्यभार असल्याने कार्यरत केंद्रप्रमुख यांच्यावर प्रशासकीय कामाचा ताण वाढत आहे. शासनाच्या विविध शैक्षणिक व इतर योजनांची अंमलबजावणी केंद्रप्रमुख यांच्यामार्फत होत असल्याने केंद्रप्रमुख यांच्या रिक्त जागा तत्काळ भरणे आवश्यक आहेत. शाळा व विद्यार्थी गुणवत्ता राखण्यासाठी, शैक्षणिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेने केंद्रप्रमुखांची ५० टक्के रिक्त जागा पदोन्नतीने तत्काळ भरावीत, अशी मागणी शिर्के यांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:16 PM 03/Jun/2025

Lok. Tilak hospi.