रत्नागिरी : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (पुणे) रत्नागिरी शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरूवारी (ता. ५) सायंकाळी ६ वाजता माळनाका येथील विवेक हॉटेलच्या सेमिनार हॉलमध्ये आयोजित केली आहे.
या सभेमध्ये दिवंगतांना श्रद्धांजली, प्रास्ताविक, कार्यकारिणीतील रिक्त पदी चर्चेअंती सभासदांची निवड करण्यात येणार आहे. तसेच बॅंकखाते कार्यान्वित करण्याबाबत चर्चा करून कागदपत्रांची पूर्तता केली जाईल. या वर्षामध्ये आयोजित करावयाच्या कार्यक्रमांविषयी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे तसेच आयत्यावेळच्या विषयांवरही चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. या सभेकरिता शाखेच्या सर्व सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:53 05-06-2025














