चिपळूण : रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्र, गुढेफाटा, मिलिंद हायस्कूल येथे गतिरोधक बसवण्याची मागणी

चिपळूण : चिपळूण गुहागर मार्गावर मिलिंद हायस्कूल, रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्र रामपूर, गुढेफाटा रामपूर मृत्यूचे सापळे बनले आहेत. आठवड्यातून तीन ते चार छोटे-मोठे कायम अपघात होतात. रविवारी संध्याकाळी ६ वा. सुमारास दोन गाईंना चार चाकी वाहनाने धडक दिल्याने जागेवरच गतप्राण झाल्या. त्यामुळे या ठिकाणी गतिरोधक बसवावेत, अशी मागणी होत आहे.

या ठिकाणी मोठे कंटेनर, गॅसचे टँकर, ट्रक, टॅक्सी एस.टी., मोठ्या प्रवासी खाजगी ट्रॅव्हल्स, रिक्षा, दुसाकी गाड्यांची सतत रहदारी असते. गुहागरकडून येताना घोणसरे, रामपूर वाकणावर मारुती मंदिर पासून गाड्या प्रचंड वेगाने येतात जातात. त्यांना विमानात बसल्यासारखे वाटते. पादचारी जीव मुठीत घेऊन चालतात. रस्ता ओलांडता येत नाही. नागरिकांचे प्रचंड हाल होतात. गुढे फाटा चौक, रामपूर हॉस्पिटल समोर, मिलिंद हायस्कूल समोर सतत अपघात होतात.

अजून किती जणांचे बळी गेल्यावर गतिरोधक बसणार. सार्वजनिक बांधकाम खाते मूग गिळून गप्प आहे. मनीषा कन्स्ट्रक्शनने रस्ता सिमेंटचा तयार केला. तो निकृष्ट दर्जाचा आहे. रस्त्यावरील सिमेंट उडून गेले. बरेच ठिकाणी खडीवर आली आहे. रस्त्याला अनेक ठिकाणी भेगा पडत्या आहेत. अत्यंत निकृष्ट रस्ता अपघाताला कायम निमंत्रण देत आहेत. तहसीलदार चिपळूण, प्रांत अधिकारी, जिल्हाधिकारी, अभियंता सां. बा. विभाग अधिकारी यांना अनेक वेळा कळवले, पण उपयोग नाही. तातडीने उंच गतिरोधक गुढेफाटा, रामपूर हॉस्पिटल समोर, मिलिंद हायस्कूल येथे तयार करून जलद वाहतुकीवर नियंत्रण ठेवावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 PM 05/Jun/2025

Bgauss