दापोलीत चिरेखाणीवरील मीटर रूम फोडून 37 हजारांचा ऐवज लंपास

दापोली : दापोली तालुक्यातील जालगाव ब्राम्हणवाडी येथील एका चिरेखाणीवरील मीटर रूम फोडून अज्ञात चोरट्याने सुमारे 37,000 रुपये किमतीचे साहित्य चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घरफोडी 23 मे 2025 ते 4 जून 2025 या कालावधीत घडली असून, 5 जून 2025 रोजी रात्री उशिरा याप्रकरणी दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मकंद सीताराम तांबे (वय 64, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, जालगाव, ता. दापोली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांची जालगाव ब्राम्हणवाडी येथील सर्वे नं. 53/5 या जागेतील चिरेखाणीवर मीटर रूम आहे. अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमतीशिवाय, स्वतःच्या फायद्यासाठी मीटर रूमच्या दरवाजाचे कुलूप कटावणीसारख्या अवजाराने तोडून आत प्रवेश केला.

चोरट्याने मीटर रूममधून चिरेखाणीसाठी उपयुक्त असलेले खालील साहित्य चोरून नेले आहे:

पिवळ्या रंगाचा लोखंडी कटर शाफ्ट: किंमत 15,000 रुपये
चिरे कटिंग करण्यासाठी वापरण्यात येणारी गोलाकार दाते असणारी तीन ब्लेड: किंमत 15,000 रुपये
ट्रॅक्टरच्या चाकांना लावण्यात येणारे चार वेट: किंमत 5,000 रुपये
लोखंडी पत्र्याचा टूल बॉक्स: किंमत 1,000 रुपये
लोखंडी लहान-मोठ्या चार कटावण्या: किंमत 1,000 रुपये
एकूण 37,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. दापोली पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 च्या कलम 331(3), 331(4), 305(अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. दापोली पोलिस पुढील तपास करत आहेत.

Happy journey

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:24 06-06-2025