पाली : रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत पाली पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोहन कांबळे यांना पोलीस उपनिरीक्षक पदी बढती मिळाली असून त्यांना आज रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते स्टार लावून सन्मानित करण्यात आले यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीमती गायकवाड उपस्थित होत्या.
मोहन कांबळे यांना पोलीस उपनिरीक्षक पदी बढती मिळाल्याबद्दल पालीचे सरपंच विठ्ठल सावंत, उपसरपंच संतोष धाडवे, हातखंबा जि.प.गट शिवसेना विभागप्रमुख सचिन सावंत, युवा सेना विभाग प्रमुख अॅड. सुयोग कांबळे, अॅड. सागर पाखरे यांनी अभिनंदन केले आहे
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:13 PM 12/Jun/2025














