सीए इन्स्टिट्यूट रत्नागिरी शाखेतर्फे वृक्षारोपण

रत्नागिरी : सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेने वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न केले.

शहरातील सावंत उद्यान येथे हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम होता.

शाखेसाठी कदंब, रुई, अशोक, आपटा अशी विविध प्रकारची झाडे प्रदीप दिवेकर यांनी योगेश्वरी नर्सरीमधून मोफत उपलब्ध करून दिली.

वृक्षारोपणाला शाखेचे अध्यक्ष सीए मंदार जोशी, उपाध्यक्ष सीए केदार करंबेळकर, सीए मंदार देवल, सामाजिक कार्यकर्ते समीर करमरकर, सोनल आंब्रे, महेश आंब्रे उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:53 17-06-2025