रत्नागिरीत २६ जून रोजी “कृत्रिम बुद्धिमता तंत्रज्ञानाचा कार्यालयीन उपयोग” विषयावर कार्यशाळा

रत्नागिरी : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती २६ जून या सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून “कृत्रिम बुद्धिमता तंत्रज्ञानाचा (AI) कार्यालयीन उपयोग” या विषयावर कार्यशाळेचे २६ जून रोजी दुपारी १२ ते १.३० या वेळेत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण आणि जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, कुवारबांव येथे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यशाळेचा लाभ जिल्ह्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण दीपक घाटे यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:08 PM 18/Jun/2025

Tata safari