जनगणनेचा मुस्लिम समाजाला दिलासा : जाकीर शेकासन

सावर्डे : राष्ट्रीय जनगणना २०२७ पासून सुरू होत आहे. जनगणनेमुळे मुस्लिम समाजातील मागास प्रवर्गाला गरीबीतून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मुस्लिम समाजाने कोणाच्या दबावाखाली न येता आपली पोटजात जनगणनेवेळी नमूद करावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग रत्नागिरी जिल्हाध्यक्ष जाकीर शेकासन यांनी केले आहे.

मुस्लिम समाज एकसंध असल्याचे भासवले जाते. त्यामुळे अतिदुर्बल मुस्लिमांच्या वाट्याला येणारे संघर्ष अनेकदा दुर्लक्षित राहतात. दुसरीकडे या मांडणीमुळे मुस्लिम समाजाअंतर्गत असणारे सामाजिक स्तर आणि जातआधारित असमानता याकडेही दुर्लक्ष होते. त्यांना भेडसावणारी सामाजिक-आर्थिक आव्हाने आणि मागण्या बाजूला पडतात. राष्ट्रीय जातगणनेमुळे मुस्लिम समुदायातील जातीय विविधतेला अधिकृतता मिळेल. जातीनिहाय जनगणनेतून मिळालेल्या मुस्लिम समुदायातील जातीनिहाय माहितीचे विश्लेषण त्यांच्यासाठी धोरण आखण्यासाठी आधारभूत ठरेल, असे शेकासन यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 19-06-2025

Tata sierra