चिपळूणच्या ऐश्वर्या जाधव हिने अमेरिकेत मिळवली सायबर सिक्युरिटीमध्ये मास्टर्स डिग्री

चिपळूण : चिपळूणच्या ऐश्वर्या जाधव हिने अमेरिकेतील डी पॉल युनिव्हर्सिटीमधून सायबर सिक्युरिटी या विषयात प्रथम श्रेणीत मास्टर्स डिग्री उत्तीर्ण केली आहे. पदवीदान समारंभ नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला.

ऐश्वर्या ही पाग बौद्ध कॉलनी येथील रहिवासी असून, तिचे वडील रवींद्र जाधव हे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे वाहतूक नियंत्रक अधिकारी आहेत.

ऐश्वर्याचे शालेय शिक्षण ख्रिस्त ज्योती हायस्कूल, सेक्रेड हार्ट हायस्कूल आणि फातिमा हायस्कूल, अंबरनाथ येथे झाले. त्यानंतर ती सिद्धार्थ कॉलेज (मुंबई) येथून बारावी सायन्स उत्तीर्ण झाली.

त्यानंतर सिंहगड कॉलेज, लोणावळा येथून तिने कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. आपली शैक्षणिक वाटचाल अधिक सक्षम करण्यासाठी तिने अमेरिकेतील डी पॉल युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला आणि सायबर सिक्युरिटीसारख्या स्पर्धात्मक व जागतिकदृष्ट्या महत्त्वाच्या क्षेत्रात मास्टर डिग्री मिळवली.

Tata motars tiago

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:53 AM 20/Jun/2025