श्री क्षेत्र मार्लेश्वरला दर्शनाला येणाऱ्या भाविकांसांठी ड्रेस कोड लागू

संगमेश्वर : श्री क्षेत्र मार्लेश्वर या पर्यटन स्थळी भाविकांनी वावरताना आपला पेहराव हा आपल्या हिंदू परंपरेला साजेसा, सुसंस्कृत, शुचिर्भुत असावा. जेणेकरुन श्री स्वयंभू महादेवाचे दर्शन घेताना मंदिर परिसरातील वातावरणात आपल्याला लाभलेला सांस्कृतिक वारसा व मंदिर परिसराचे पावित्र्य टिकवणारा असेल, तरी भाविकांनी अंगभर वस्त्र परिधान करूनच श्री स्वयंभू मार्लेश्वराचे दर्शन घ्यावे, असे आवाहनही श्री मार्लेश्वर देवस्थान समिती कडून करण्यात आले आहे.

विशेषतः पावसाळ्यात श्री क्षेत्र मार्लेश्वर पर्यटन स्थळी येणाऱ्या सर्व भाविकांची सुरक्षितता लक्षात घेता श्री मार्लेश्वर मंदिर समितीने श्री देव मार्लेश्वर दर्शनाची वेळ निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून श्री क्षेत्र मार्लेश्वर मंदिर सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत भाविकांसाठी खुले राहिल. तसेच श्री देव मार्लेश्वराचे श्रावणी सोमवार अथवा वार्षिक धार्मिक विधी ऊत्सवावेळी त्या त्यावेळी योग्य निर्णय घेवून मंदिर भाविकांसाठी जास्त कार्यकाळ खुले राहिल.

श्री क्षेत्र मार्लेश्वर देवस्थान संबंधी धार्मिक व भौगोलिक माहिती देताना वा घेताना ती देवस्थानचे अधिकृत विश्वस्त व देवस्थान समिती यांचेकडून घेवून ती प्रकाशित करण्यात यावी. तसेच देवस्थानच्या समिती व्यतिरिक्त इतरांनी दिलेली माहितीची खातरजमा न करता सोशल मिडियाद्वारे चुकीची प्रसारित करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:49 PM 20/Jun/2025

Happy journey english