चिपळूण : सुप्रसिद्ध निसर्ग अभ्यासक, अरण्यरक्षक मारुती चितमपल्ली यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी २३ जूनला चिपळूण येथील लोटिस्मामधील सभागृहात आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन लोकमान्य टिळक वाचनालय, ग्लोबल चिपळूण संस्था आणि अॅक्टिव्ह ग्रुप चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. चितमपल्ली यांच्या जीवनकार्याचा आढावा, त्यांचे निसर्ग संवर्धनासाठीचे योगदान आणि त्यांच्या साहित्यिक कार्याचे स्मरण या सभेमध्ये करण्यात येणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 AM 21/Jun/2025














