रत्नागिरीत अविनाश धर्माधिकारी यांचे ‘ऑपरेशन सिंदूर’वर विशेष व्याख्यान!

रत्नागिरी, २१ जून २०२५ : चतुरंग प्रतिष्ठान आणि रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, २३ जून रोजी सायंकाळी ६:१५ वाजता स्वा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी येथे एक विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. निवृत्त सनदी अधिकारी आणि प्रख्यात अभ्यासक, व्याख्याते अविनाश धर्माधिकारी हे “ऑपरेशन सिंदूर: पूर्वपीठिका आणि उत्तरदायित्व” या विषयावर मार्गदर्शन करतील.

अनेक महिन्यांनी अविनाश धर्माधिकारी यांच्या व्याख्यानाचा योग रत्नागिरीमध्ये जुळून आला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि त्यासंबंधित परिस्थितीमुळे प्रत्येक भारतीय नागरिक आता अधिक जागरूक झाला आहे. या पार्श्वभूमीवर, धर्माधिकारी यांचे हे व्याख्यान रत्नागिरीकरांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

चतुरंग प्रतिष्ठान आणि रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाने विशेषतः युवावर्गाला या व्याख्यानाला उपस्थित राहण्याचे विनम्र आवाहन केले आहे. रत्नागिरीतील नागरिकांनी वेळेवर उपस्थित राहून कार्यक्रमाच्या नियोजनास सहकार्य करावे, असेही आवाहन आयोजकांनी केले आहे.

या संधीचा लाभ घेऊन ‘ऑपरेशन सिंदूर’ या महत्त्वाच्या विषयावर सखोल माहिती जाणून घेण्यासाठी उपस्थित रहा.

Tata sierra

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:57 21-06-2025