लांजा नगरपंचायतीच्या प्रभाग ६ मध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत

लांजा : लांजा नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ६ मधील जावडे रोड, आग्रे हॉल परिसरात भटक्या आणि पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत असून त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी येथील नागरिकांच्या वतीने लांजा नगर पंचायतीकडे करण्यात आली आहे.

याबाबत येथील जागरूक नागरिक असलेले विलास गोरे यांनी याबाबतचे निवेदन नगरपंचायतीला सादर केले आहे. गेल्या काही दिवसांपासून नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ६ मध्ये परिसरातील जावडे रोड, आग्रे हॉल, जावडे फाटा या परिसरात दोन भटक्या आणि पिसळलेल्या कुत्र्यांनी दहशत माजवली आहे. ही कुत्री सडलेल्या अवस्थेत असून ती नागरिकांच्या घरात घुसत आहेत.

त्याचप्रमाणे रस्त्यावरून ये-जा करणारे, वृद्ध नागरिक, लहान मुले यांना देखील या भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांमुळे धोका संभवतो आहे. लहान मुले, नागरीक यांना ही कुत्री चावल्यास गंभीर दुखापत होऊ शकते. त्यामुळे या कुत्र्यांचा योग्य तो बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे.

या भटक्या आणि पिसाळलेल्या कुत्र्यांमुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे या कुत्र्यांचा नगरपंचायतीने तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.

Ratnagiri Khabardar add image

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:54 PM 21/Jun/2025