संजय राऊत यांनाही गुवाहाटीला यायचं होतं, पण….; शहाजी बापू पाटीलांचा गौप्यस्फोट

सोलापूर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडाच्या वेळी संजय राऊत (Sanjay Raut) यांनाही सोबत गुवाहटीला यायचे होते. मात्र सोबतच्या आमदारांनी संजय राऊतांना कडाडून विरोध केला.

त्यामुळे राऊत यांना सोबत घेतलं नाही आणि हीच त्यांची पोट मोठी दुखी आहे. असा मोठा दावा करत शिवसेना शिंदे गटाचे नेते शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. जर असल्या पूजा करून कोण निवडून येत असतं तर आम्हाला काय कवट्या मिळत नाहीत का? सुया मिळत नाहीत का? हे सगळं थोतांड आहे. असे सांगत मंत्री भरत गोगावलेंची (Bharat Gogawale) पाठराखण ही त्यांनी केलीय.

स्वतःच्या घरात देवाची पूजा केली, यात चूक काय?

आपल्या देशात अनादी कालापासून पूजा यज्ञ होत आलेले आहेत. गोगावले यांनी सुद्धा दिवसाढवळ्या आपल्या घरात असा यज्ञ केल्याने काय चुकीचे केले? असा सवाल बापूंनी केला. त्यांनी काय अमावस्येच्या रात्री स्मशानात जाऊन पूजा घातल्या काय? असा सवाल करीत स्वतःच्या घरात केलेली ही देवाची पूजा आहे. यात काय चूक आहे असे बापूंनी सांगितले. शिवाय गोगावले हा साधा माणूस असल्याने त्यांच्या घरातील व्हिडिओ व्हायरल झाला असेल. पण तिथं कवट्या होत्या की सुया होत्या हे बघायला संजय राऊत गेले होते की सुरज चव्हाण, असा टोलाही त्यांनी लगावलाय.

Vinayka motars

नुकत्याच झालेल्या दोन शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी गर्दीवरून केलेल्या टीकेला उत्तर देताना यांच्यामागे लोकच राहिलेली नाहीत त्यामुळे शिंदे साहेबांच्या विराट मेळाव्याला पैसेवाल्यांचा, चोरांचा मेळावा असा नवीन शोध ठाकरे यांना लगावला असे सांगितले. जर असेल हिम्मत तर समोरासमोर तसाच मेळावा घेऊन दाखवा ना, अशा शब्दात त्यांनी आव्हान दिले आहे. यांच्या मागे आता लोकचं उरली नसल्याने आता यांना राज ठाकरेंची आठवण यायला लागली आहे. मात्र संकट काळी जे राज ठाकरे यांच्या बाबत सोबत घ्यायला तयार आहेत, त्या उद्धव ठाकरे यांना त्यांच्या सुखाच्या वेळी कधी राज ठाकरे यांची आठवण आली का? असे सांगत उद्धव ठाकरे कायम त्यांना टोमणे मारत असल्याची आठवण ही शाहाजीबापू यांनी करून दिली.

सुसंस्कृत महाराष्ट्र बिघडवणारा जनक संजय राऊत- शाहाजीबापू

एकनाथ शिंदे व राज ठाकरे हे बाळासाहेबांच्या काळापासून एकत्र काम केलेले शिवसैनिक असून ती काय आज पहिल्यांदा भेटत नाहीत. जर शिंदे यांनी राज ठाकरे यांना जेवणाला बोलवले असेल, तर संजय राऊत यांना एवढं वाईट का वाटतंय? असा सवाल ही शाहाजीबापू यांनी केला आहे. संजय राऊत यांनी अडीच वर्षात महाराष्ट्राची संस्कृती पार बिघडवून ठेवली असून एवढा सुसंस्कृत महाराष्ट्र बिघडवणारा जनक संजय राऊत असल्याची टीका शहाजी बापूंनी केलीय.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:05 21-06-2025