चिपळूण : रामपूर विभागात विद्युतपुरवठा खंडित

रामपूर : चिपळूण तालुक्यातील रामपूर विभागाला वादळी वाऱ्याने झोडपले आहे. ठिकठिकाणी वीज खांब पडून व विद्युत तारा पडून वीजपुरवठा खंडीत झाला आहे. गेल्या पाच ते सहा दिवसांत या विभागात अनेक विजेचे खांब पडले आहेत. सोसाट्याच्या वादळी वाऱ्यामुळे शिरवली, गुढे, डुगवे, कळमुंडी, शिरवली, मार्गताम्हाने या ठिकाणी विद्युत तारा तुटून व वीज खांब पडून महावितरणचे मोठे नुकसान झाले आहे.

परिणामी या विभागात चार ते पाच दिवस वीजपुरवठा खंडीत झाला आहे. महावितरणचे कनिष्ठ अभियंता श्री. राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

मार्गताम्हाने व बोरगाव येथे ट्रान्सफार्मर रोहित्र बंद पडले आहे. वाघिवरे येथे पोल पडून विद्युत तारा तुटल्या आहेत. शिरवली येलोंदेवाडी येथेही नुकसान झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 AM 26/Jun/2025

Mahrashi karve ANM