राजापूर प्रांत कार्यालयातून जात दाखले मिळण्यास विलंब

पाचल : राजापूर प्रांत कार्यालयातून देण्यात येणाऱ्या जातीच्या दाखल्यांचे काम रखडल्याने ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. जातीच्या दाखल्याअभावी दहावी-बारावीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया रखडली असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती पालकांमधून व्यक्त करण्यात येत आहे. आमदार किरण सामंत यांनी याकामी तातडीने लक्ष देऊन विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

दहावी-बारावी परीक्षेचा निकाल लागून दोन महिने झाले. विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयात प्रवेश घेताना जातीच्या दाखला नसल्याने प्रवेश घेताना अडचणी निर्माण होत आहेत. सेतू कार्यालयातून जातीच्या दाखल्यासाठी प्रस्ताव करून दोन महिने उलटून गेले तरी विद्यार्थ्यांना अद्याप दाखले मिळाले नाहीत. त्यामुळे विद्यार्थी व पालकवर्गातू तीव्र स्वरूपाची नाराजी तथा संताप व्यक्त करण्यात येत आहे. आमदार किरण सामंत यांनी याकडे लक्ष देऊन दाखल्याअभावी विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:07 AM 10/Jul/2025

Khabardar diwali fest