चिपळूण नगर परिषदेची अनधिकृत बॅनर हटाव मोहीम

चिपळूण : येथील नगर परिषदेच्या पथकामार्फत शहरात अनधिकृतपणे लावलेले फलक जप्त करण्याची मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये क्यूआर कोड नसलेले शिवनदी पुलानजीकचे तीन फलक सोमवारी काढून जप्त करण्यात आले आहेत. जप्त केलेले फलक नगर परिषद कार्यालयाच्या परिसरात ठेवण्यात आले आहेत.

शहरासह कोठेही फलक लावायचा असल्यास नगर परिषद व संबंधित गावांमधील ग्रामपंचायत यांची परवानगी घेणे अनिवार्य केले आहे. परवानगी घेतल्यावर संबंधितांना क्यूआर कोड दिला जात असून, तोही त्या फलकावर छापण्याची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे ज्या फलकांवर क्यूआर कोड नसेल असे फलक जप्त करण्यासाठी नगर परिषदेने खास पथक तयार केले आहे. हे पथक दरदिवशी शहरात फिरत असून, ज्या फलकांवर क्यूआर कोड दिसणार नाहीत, ते फलक जप्त केले जात आहेत.

शिवनदी पुलानजीक तीन मोठे फलक लावण्यात आले होते. मात्र, या फलकांवर क्यूआर कोड नसल्याने ते जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई मुख्याधिकारी विशाल भोसले, बांधकाम विभागाचे प्रमुख संदेश टोपरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:43 PM 10/Jul/2025