चिपळूणमध्ये अवैध दारूविक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल; ८४० रुपयांची दारू जप्त

चिपळूण : चिपळूण तालुक्यातील पिंपळी खुर्द येथे अवैध दारूविक्री करणाऱ्या एका व्यक्तीला काल, बुधवार, ९ जुलै २०२५ रोजी दुपारी १.२५ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी रंगेहात पकडले. या प्रकरणी सुनील महादेव मोडक (वय ४०, रा. कान्हे, मोडकवाडी, ता. चिपळूण) याच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार प्रवीण सदाशिव जाधव (बकल नंबर ११८१, चिपळूण पोलीस ठाणे) यांनी पिंपळी खुर्द येथील कॅनॉल ब्रीजच्या बाजूला एका आंब्याच्या झाडाच्या आडोशाला छापा टाकला. त्यावेळी सुनील मोडक हा गैरकायदेशीरपणे आणि कोणताही परवाना नसताना देशी दारू संत्र जीएमची विक्री करत असल्याचे निदर्शनास आले.

पोलिसांनी घटनास्थळावरून १८० मिली मापाच्या देशी दारू संत्र जीएमच्या एकूण १२ प्लास्टिक बाटल्या जप्त केल्या आहेत, ज्यांची एकूण किंमत ८४० रुपये आहे.

या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात काल दुपारी ३.०६ वाजता गु.र.नं. १५९/२०२५ नुसार महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर पोलिसांकडून कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Hotel waiter

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:02 PM 10/Jul/2025