रा. भा. शिर्के प्रशालेच्या गुरुकुलमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव साजरा

रत्नागिरी : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नियमित कार्यरत असलेला शिर्के प्रशालेचा अॅड. बाबासाहेब नानल गुरुकुल प्रकल्पामध्ये दरवर्षी गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या वर्षी गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शिका म्हणून मानसोपचार तज्ञ आणि समुपदेशक सौ. ऋतुजा महेश चिगरे या लाभल्या होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना व उपासने ने झाली. या नंतर गुरुकुलातील सर्व शिक्षकांचे विद्यार्थ्यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. या वर्षी नव्यानेच गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित केलेल्या माता पाद्यपूजन सोहळ्याला पालकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांनी या गुरुपौर्णिमेनिमित्त आईला आपला प्रथम गुरु मानून आपल्या आईचे पाय धुवून पूजा केली. या नंतर प्रमुख मार्गदर्शिका सौ. ऋतुजा चिगरे यांनी विद्यार्थ्यांना आपली संस्कृती आणि संस्कारक्षम मन व याचे जीवनातील महत्त्व या विषयी बहुमूल्य मार्गदर्शन केले.

गुरुकुल प्रमुख किरण दादा यांनी प्रस्तावना केली तर सौ. मनस्विनी ताईनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:11 PM 10/Jul/2025

Tata sierra