रत्नागिरी नगर परिषदेच्या आरोग्य विभागाला मिळणार नवीन २० सफाई कामगार

रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेच्या आरोग्य विभागाला सुमारे नवीन २० सफाई कर्मचारी मिळणार आहेत. पालकमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते शनिवारी या सफाई कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्रे दिली जाणार आहेत.

आरोग्य विभागात काम करणाऱ्या जुन्या कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी लाड पागे समिती नेमण्यात आली होती. या समितीने सफाई कामगारांच्या वारसांना नोकरीत सामावून घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार २० सफाई कामगारांना सामावून घेतले जाणार आहे.

रत्नागिरी नगर परिषदेकडे ८० स्थायी सफाई कामगार आहेत त्यात नव्या २० कामगारांची भर पडणार आहे. त्यामुळे शहरातील स्वच्छता पूर्ण क्षमतेने होऊ शकणार आहे. रत्नागिरी नगर परिषदेच्या सभागृहात होणाऱ्या छोटेखानी कार्यक्रमावेळी नुतन सफाई कामगारांना नियुक्ती पत्रे दिली जाणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 AM 12/Jul/2025

Khabardar diwali fest