चिपळूण : शहरातील पाग येथे सात मजली इमारतीचे काम सुरू असताना सेंट्रिंगचे काम करताना सहाव्या मजल्यावरून पडून एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. यामध्ये संजीव रामसुरेश कुमार (२८, सध्या रा. खेर्डी भुरणवाडी) असे मृत कामगाराचे नाव आहे.
ही घटना शनिवारी (दि.१२) दुपारी १२:४५ वाजण्याच्या घडली. या बाबत रवरू ज्योतिबा गुरव यांनी चिपळूण पोलिसांना खबर दिली. पॉवर हाऊसजवळ आरसीसी सेंट्रिंगचे काम करीत असताना सहाव्या मजल्यावरून पाय घसरून पडला.
इमारतीवरुन कोसळल्यानंतर सोबत काम करणाऱ्या कामगारांकडून तत्काळ कामथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संजीव रामसुरेश कुमार याला मृत घोषीत केले. दरम्यान, हा प्रकार नेमका कसा घडला, याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:30 AM 14/Jul/2025














