चिपळूण : स्थानिकांचा विरोध असतानाही अदानी पॉवर कंपनीने जुने चालू वीज मीटर काढून नवीन स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरु केले आहे. मात्र, बदललेले मीटर जलद रिडींग दाखवत असल्याने ग्राहक तक्रार घेऊन महावितरण कार्यालयात गेल्यानंतर तपासण्याची मीटर कोणतीच सुविधा महावितरण कंपनी आणि ठेकेदार कंपनीकडे नाही. त्यामुळे जोपर्यंत सदोष मीटर तपासण्याची व्यवस्था महावितरण कंपनी किंवा ठेकेदार कंपनी करत नाही, तोपर्यंत स्मार्ट मीटर बसवू नयेत, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी नुकतेच पावसाळी अधिवेशनात केली.
ऊर्जा विभागावरील चर्चेदरम्यान आमदार निकम यांनी विविध प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधले. शहरातील विद्युत वाहिनी पोलवरून दिलेली असल्याने ऊन, वादळ, वारा आणि विशेषतः पोलवरील विद्युत पुरामुळे या वाहिन्यांपासून नैसर्गिक आपत्तीच्या काळात मोठा धोका निर्माण होतो. विद्युत पोलवरील तारा तुटून पडल्याने विजेचा झटका बसून माणसे तसेच जनावरांचा नाहक बळी जातो, वीजपुरवठा खंडित होतो. या घटनांनंतर शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई अनेकवेळा उशिरा मिळते किंवा काहीवेळा मिळतदेखील नाही. म्हणूनच चिपळूण शहरातील सर्व विद्युत वाहिन्या तत्काळ भूमिगत करण्यात याव्यात. वाडीवस्ती, शाळा, बाजारपेठ आणि रस्ता क्रॉसिंग येथील वीज वाहिन्यांना गार्डीग किंवा स्पेसर लावण्यात यावेत.
तालुक्यातील मिरजोळी कोलेखाजण येथे महावितरणच्या निष्काळजीपणामळे विद्युत प्रवाहामुळे शेतकऱ्याच्या ५ दुधाळ म्हशी मृत्युमुखी पडल्या व त्यात १ म्हैस गंभीर जखमी झाली. यात सदर शेतकऱ्याचे ५. २५ लाख रुपयांचे नुकसान झाले असूनही महावितरणने केवळ १.८० लाख इतकीच भरपाई मंजूर केली आहे.
त्यामुळे शासनाने अशा दुर्घटनेबाबत स्पष्ट धोरण व निकष ठरवावेत. महावितरण कंपनीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, विशेष करुन दुधाळ जनावर योजनेप्रमाणे रुपये ८० हजार प्रतिजनावर नुकसान दर लागू करावा अशी आग्रही मागणी आहे. महावितरण कंपनीकडे निधी उपलब्ध नसतो, तेव्हा ग्राहकाला स्वखर्चातून कनेक्शन दिले जाते.
ग्राहकाने केलेला खर्च महावितरण कंपनी दरवर्षी समान ५ हप्त्यात देते. त्यामध्ये कोणतीच सव्र्व्हस ग्राहकांना देत नसताना सर्व्हस कनेक्शन चार्जेसच्या नावाखाली लाखो रुपये कपात करते. मात्र, ग्राहकाने सर्व कामे स्वखर्चान केलेली असल्याने हे पैसे अदा करू नयेत व ग्राहकाला केलेला खर्च ५ हप्त्यात न देता एकाचवेळी देण्यात यावा, अशी मागणी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 AM 14/Jul/2025














