खेड महावितरणचे कर्मचारी देशव्यापी संपात सहभागी

खेड : संयुक्त कृती समिती १ तर्फे एकदिवसीय देशव्यापी लाक्षणिक संप खेड महावितरण कार्यालयासमोर करण्यात आला. यावेळी वर्कर्स फेडरेशनचे खेड, दापोली, मंडणगड येथील पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृती समितीमध्ये सहा संघटना महाराष्ट्रात सामील झाल्या होत्या.

खेडच्या संपात महेश डिंगणकर, सर्कल सचिव, वर्कर्स फेडरेशन, नितनवरे, बाळकृष्ण झोरे मागासवर्गीय संघटना, अनंत सावर्डेकर, स्वप्निल कुंभार, सचिन कांबळे, समिर पिलके, मोहन लोंढे, श्रृती कदम, आंबुर्ले, पारधी, बंटी जाधव, ओंकार शिर्के, मांडवकर, नयन यादव, अंगदकुमार मिठेवाड, प्रसाद कांबळे, संतोष जागडे, विलास गोसावी, प्रथमेश शिरशिवकर, सुनील जावळे, सावरकर, रुषी बुरटे, साई कांबळे, जोगी, आशिष कदम आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:07 AM 14/Jul/2025