रत्नागिरीत ‘मिसेस श्रावण क्वीन’ आणि ‘प्रिन्स-प्रिन्सेस’ स्पर्धेची ऑडिशन्स दणक्यात!

रत्नागिरी, १३ जुलै २०२५ : रत्नागिरीच्या स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात ‘मिसेस श्रावण क्वीन ऑफ रत्नागिरी – सीजन २’ आणि ‘प्रिन्स अँड प्रिन्सेस ऑफ रत्नागिरी – सीजन १’ या दोन भव्य स्पर्धांची ऑडिशन्स मोठ्या उत्साहात आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. या ऑडिशन्सला महिला आणि ६ ते १२ वयोगटातील मुला-मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

स्पर्धकांनी सादर केलेले इंट्रोडक्शन, कॅटवॉक आणि टॅलेंट राऊंड्स इतके दर्जेदार होते की, क्षणभर परीक्षकांनाही हे ऑडिशन नसून थेट अंतिम फेरीच सुरू आहे, असे वाटले. किरण डान्स अकॅडमीने यंदाही नवनवीन प्रयोग करत, प्रत्येक स्पर्धकाला आत्मविश्वासाने आपली कला सादर करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिले. संस्थेचे संस्थापक आणि सुप्रसिद्ध कोरिओग्राफर किरण गोपीनाथ बोरसुतकर यांची यामागे असलेली मेहनत आणि स्पष्ट दिशा स्पष्टपणे दिसून आली.

या ऑडिशनचे परीक्षण सौ. धनश्री विचारे, सौ. तेजश्री, सौ. राधिका चव्हाण, श्री. अमर शेठ आणि सौ. पौर्णिमा मुलुख यांनी अत्यंत निपक्षपणे केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अनेक मान्यवरांचा पाठिंबा लाभला असून, विशेषतः श्री. अमेय विरकर यांचे मार्गदर्शन अत्यंत मोलाचे ठरले आहे.

या स्पर्धांचा ग्रँड फिनाले १७ ऑगस्ट २०२५ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी येथे पार पडणार आहे. रत्नागिरीकरांनी या सांस्कृतिक सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहून आपल्या शहरातील कलाकारांना प्रोत्साहन द्यावे आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन आणि जबाबदारी किरण डान्स अकॅडमीचे संचालक किरण बोरसुतकर यांच्याकडे असून, त्यांनी सर्व स्तरांवर उत्तम संयोजनाची हमी दिली आहे.

Mahrashi karve ANM

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:21 14-07-2025