देवरुख : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रत्नागिरी यांचे निर्देशानुसार सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) खरीप हंगाम २०२५ साठी रत्नागिरी जिल्ह्यात लागू करण्यात आली आहे या योजनेमध्ये भात आणि नाचणी पिकांचा समावेश असून संगमेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
विमा कंपनी भारतीय कृषी विमा कंपनी समाविष्ट तालुके व महसूल मंडळे खरीप हंगाम २०२५ साठी रत्नागिरी जिल्ह्यातील ९ तालुक्यांमधील सर्व ८३ महसूल मंडळे भात व नाचणी पिकासाठी अधिसूचित करण्यात आली आहेत. यासाठी भात पिकासाठी शेतकरी हिस्सा रक्कम रू.४५७.५० प्रति हेक्टर नाचणी पिकासाठी शेतकरी हिस्सा रक्कम रू.८७.५० प्रति हेक्टर आहे. शेतकऱ्यांना ऍग्रीस्टॅक योजनेतील फार्मर आयडी (ऋशीशी खऊ) असणे बंधनकारक आहे.
मोबाईल अॅपद्वारे पिकाची ई पीक पहाणी अंतर्गत नोंदणी करणे बंधनकारक आहे. पीक विमा भरण्याची अंतिम मदत ३१ जुलै २०२५ आहे. शेतकऱ्यांनी नोंदणी करण्यासाठी नजीकच्या बैंक शाखेशी किंवा सीएसी केंद्राशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी आपल्या गावामधील सहायक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांचेशी संपर्क साधावा. सध्या पुनर्लागवडीची कामे सुरू असल्याने, शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी तत्काळ नोंदणी करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:53 AM 14/Jul/2025














