रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याचे नूतन अपर पोलीस अधीक्षक म्हणून बाबुराव महामुनी यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. यावेळी बदली झालेल्या अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
बाबुराव महामुनी यांना यापूर्वी चंद्रपूर, नागपूर, सातारा आणि इचलकरंजी येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून काम करण्याचा अनुभव आहे. इचलकरंजी येथून त्यांना बढती मिळाली होती आणि ते बुलढाणा येथे अपर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी त्यांची रत्नागिरी जिल्हा अपर पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली होती आणि त्यानुसार त्यांनी आज पदभार स्वीकारला. रत्नागिरी जिल्ह्याची सविस्तर माहिती घेऊन उत्कृष्ट कामगिरी करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:09 14-07-2025














