आदर्श विद्यामंदिर पाली क्र.१ चे तीन विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत

पाली (वार्ताहर) : तालुक्यातील जि.प.आदर्श विद्यामंदिर पाली नं.१ शाळेतील विद्यार्थी दिक्षा महेंद्र मेस्त्री ही जिल्हा गुणवत्ता यादीत पाचवी व रत्नागिरी तालुक्यात प्रथम, हर्ष महेश धाडवे हा जिल्हा गुणवत्ता यादीत २६ वा तर रत्नागिरी तालुक्यात चौथा, सत्वशील सहदेव गुरव जिल्हा गुणवत्ता यादीत ११२ वा तर तालुक्यात ११ येऊन हे तीन विद्यार्थी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत पाचवी मध्ये गुणवत्ताधारक झाले आहेत. जि.प.च्या मराठी माध्यमाच्या ऐकाच शाळेतील या तीन विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीसाठी निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती त्याचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यामध्ये जि.प.आदर्श विद्यामंदिर पाली नं.१ या शाळेतील ऐकाच वेळी तीन विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीमध्ये निवड होण्याबरोबरच या अगोदर याच तिघांची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झालेली असून त्यांच्या या यशामागे प्रशालेतील प्रमुख मार्गदर्शक शिक्षक मारुती घोरपडे हे असून त्याचसोबत मुख्याध्यापक जनार्दन मोहिते, शिक्षक ममता सावंत, श्रद्धा रसाळ, नेहा जाधव, श्रुती वारंग यांचे मार्गदर्शन लाभले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत, सहसचिव प्रेरणा शिंदे, रत्नागिरी तालुका पं. स.गटशिक्षणाधिकारी डॉ.दत्तात्रय सोपनूर, केंद्रप्रमुख विष्णु पवार, उपसरपंच संतोष धाडवे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमेश शिंदे, युवासेना विभाग प्रमुख अ‍ॅड.सुयोग कांबळे, अ‍ॅड.सागर पाखरे, गणेश चव्हाण, श्रीकांत राऊत, विजय राऊत, महेश धाडवे यांनी अभिनंदन केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:12 15-07-2025

Naadi pariksha