राजापूर : सोलगाव शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतला भात लावणीचा आनंद

राजापूर : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा सोलगाव क्रमांक २ च्या विद्यार्थ्यांनी ‘एक तास शेताच्या बांधावर’ घालवत प्रत्यक्ष शेतीच्या कामाचा अनुभव घेतला. विद्यार्थ्यांनी शेतातील चिखल तुडवत, मातीशी खेळत प्रत्यक्ष भात लावणीचा आनंद लुटला.

हा उपक्रम शाळेचे मुख्याध्यापक दीपक धामापूरकर यांच्या संकल्पनेतून केंद्रप्रमुख लक्ष्मण फाटक यांच्या उपस्थितीत पार पडला. विद्यार्थ्यांचे शेतजमिनीशी तुटू पाहणारे नाते व विद्यार्थ्यांची मातीपासून विलग होणारी नाळ जोडण्याचे कार्य या उपक्रमातून व्हावे, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमावेळी शाळेचे मुख्याध्यापक व काही मुलींनी स्वतः नांगर हातात धरून स्वावलंबनाचा जणू पाठच सर्व विद्यार्थी व ग्रामस्थांच्या पुढे सादर केला

यावेळी शाळेतील सहकारी शिक्षक, स्वयंपाकी पुष्पमाला नांगरेकर, सतीश कामतेकर, चैत्राली तिर्लोटकर, दीपाली नांगरेकर, राजश्री कामतेकर, वासंती कामतेकर, दामोदर नांगरेकर, वंदना कामतेकर, वनिता परवडी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:36 PM 15/Jul/2025

Mahrashi karve ANM