रत्नागिरी, १५ जुलै : राजापूर तालुक्यातील नाटे येथील देवरुखकरवाडी येथे सुरू असलेल्या एका नवीन घराच्या बांधकामाच्या ठिकाणी ५६ हजार रुपये किमतीच्या सेंट्रिंगच्या लोखंडी प्लेट्सची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना १५ जुलै रोजी सायंकाळी ६ ते १६ जुलै रोजी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान घडली.
या प्रकरणी सजल सुधाकर वास्कर (वय ३४, व्यवसाय सेंट्रिंग बांधकाम, रा. घर नं. १८०५, सागवे, कात्रादेवी, ता. राजापूर) यांनी नाटे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, सौरभ शरदचंद्र सुतार यांच्या सागवे कात्रादेवी, देवरुखकरवाडी येथील नवीन घराच्या सेंट्रिंग कामासाठी घराशेजारी ठेवलेल्या ११० लोखंडी सेंट्रिंग प्लेट्स अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या आहेत. चोरी झालेल्या प्लेट्सची किंमत ५६,००० रुपये असून, त्यांची साईज २४ x ३ फूट लांबी-रुंदीची आयताकृती आहे. या प्लेट्सवर इंग्रजीमध्ये मोठ्या अक्षरात ‘SSV’ असे लिहिलेले आहे.
नाटे पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून, भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३०३(२) नुसार अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:36 17-07-2025














