नरबे अपघातातील गंभीर जखमी असलेल्या एकाचा मृत्यू

रत्नागिरी : बुधवारी सकाळी ६.३० वा. सुमारास नरबे फाटा येथे ट्रक आणि टेम्पोमध्ये धडक होउन झालेल्या अपघातातील गंभीर जखमी मुज्जफीर अमजत जांभारकर (२४) तरुणाचा कोल्हापूरला पोहचल्यावर मृत्यू झाला.

मुज्जफीरच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. कोल्हापूर येथे अधिक उपचारांसाठी मुज्जफीरला नेण्यात येत असताना त्याचा कोल्हापूरला पोहचल्यावर तेथील रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी मृत्यू झाला. त्याचा मृत्यू झाला हे कोणी घोषित केले. या अपघातातील फिरदोस न्यायत खले (४०) आणि अमजत आलेमिया जांभारकर (५०, दोन्ही रा. पडवे गुहागर, रत्नागिरी) या दोघांवर उपचार सुरू असून या अपघात प्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 AM 17/Jul/2025