राजापूरच्या माजी नगरसेविका सुनीता ठाकूरदेसाई यांचे निधन

रत्नागिरी : राजापूर अर्बन बँकेच्या माजी संचालिका आणि राजापूरच्या माजी नगरसेविका सुनीता ठाकूरदेसाई (वय ६८) यांचे बुधवारी सकाळी निधन झाले.राजकारण आणि समाजकारण या दोन्ही क्षेत्रांमध्ये त्यांनी आपली स्वतंत्र छाप पाडली होती.

त्यांचे पती अनिल ठाकुरदेसाईदेखील राजापूर अर्बन बँकेचे माजी संचालक होते. कै. ठाकूरदेसाई यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे आणि मोठा कुटुंब परिवार आहे.

सुनीता ठाकूरदेसाई यांचा परिसरात जनसंपर्क दांडगा होता. राजापूर व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर यांच्या त्या सासूबाई होत. त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रेमळ, हळवे आणि कर्तव्यदक्ष होते. सामान्यांच्या समस्या संवेदनशीलतेने हाताळून, योग्य मार्ग काढण्याचे, तसेच परखडपणे वरिष्ठांना चुका दाखवून देण्याचे त्यांचे कसब नेहमी वाखाणले गेले. धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रातही त्यांचे गाढे ज्ञान होते. त्यांनी अनेकदा प्रवचनांद्वारे समाजप्रबोधन केले. उत्तरायुष्यात त्यांनी अनेक महिलांना संस्कृत गीतेचे श्लोक, त्यांचे मराठी अर्थ समजावून दिले. श्लोकांना चाल लावून ते सहजगत्या शिकविण्यात त्यांना आनंद मिळत असे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 17-07-2025

Hotel waiter