राजापूर : पाचल-जवळेथर रस्त्यावर महावितरणतर्फे ११ केव्ही ची नवीन लाइन टाकण्याच्या कामाची परवानगी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घेतलेली नाही. तसेच हे काम करताना नियम धाब्यावर बसवले आहेत, असा आक्षेप तळवडे येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश गुडेकर यांनी घेतला.
चुकीच्या पद्धतीने सुरू असलेले काम निदर्शनास आणून देत श्री. गुडेकर यांनी प्रशासनाला जाब विचारला. याची बांधकाम विभागासह महावितरण विभागाकडून तत्काळ दखल घेत घटनास्थळी भेट दिली. तसेच रस्त्यालगत चुकीच्या पद्धतीने टाकलेले विद्युत खांब काढण्याचे आणि खड्डा मातीऐवजी सिमेंट काँक्रीटने भरण्याचे आदेश ठेकेदारांला देण्यात आले आहेत, असे गुडेकर यांनी सांगितले.
महावितरणच्या माध्यमातून ११ के. व्ही. ची लाइन टाकण्याचे काम पाचल- जवळेथर रस्त्यावर सुरू आहे. हे काम करीत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घेणे अपेक्षित होते. मात्र, तशी परवानगी न घेता ठेकेदाराकडून रस्त्याच्या कडेला पोल टाकले जात होते. त्यामुळे या पोलांचा वाहतुकीला धोका होण्याचा संभव असल्याचे त्यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:51 AM 17/Jul/2025














